महात्मा ते राजीव गांधी….सर्वांपेक्षा मोदीच श्रेष्ठ

भाजप नेत्यांनी का वरून उधळलेल्या मुक्ताफळांमुळे वादंग

नवी दिल्ली – वादग्रस्त ठरलेल्या नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या (का) विरोधात देशभरात निदर्शनांचे सत्र सुरू आहे. अशातच भाजपच्या काही नेत्यांची मुक्ताफळे वादंगाला कारणीभूत ठरत आहेत. नागरिकता संशोधन कायदावरून भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा  यांनी शिमला येथे आय़ोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कौतुकाचा वर्षाव केला. मात्र जेपी नड्डा  यांनी  सभेत केलेल्या आक्रमक वक्तव्ये करून वाद ओढवून घेतला.

नड्डा म्हणाले,’महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि मनमोहन सिंग जे करू शकले नाही, ते मोदींनी करून दाखवले आहे. आम्ही पाकिस्तानातील पीडित अल्पसंख्यांक नागरिकांना भारतात परत आणू, मात्र ते करण्यात त्यांना अपयश आले. याउलट पंतप्रधान मोदींनी ते करून दाखवलं आहे.

दरम्यान, नड्डा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बिहारमधील 11 जिल्हा कार्यालयांचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचा आणि लोकांना हे तंत्रज्ञान समजावून सांगण्याच्या सूचना केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बिहारवर आशीर्वाद आहे. त्यांनी येथे कोट्यवधीचा निधी दिला आहे. हा निधी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविल्याचे नड्डा म्हणाले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.