‘आशियातील सर्वात सेक्सी पुरुष २०१९’च्या यादीमध्ये हृतिक

मुंबई – सुपरस्टार हृतिक रोशन केवळ भारतातच नाही तर जगभर आपल्या दमदार अभिनयामुळे आणि हॅंडसम पर्सनॅलिटीमुळे प्रसिद्ध आहे. गेल्या काही वर्षांपासून तो आपल्या लुक आणि आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवतो आहे.

 

View this post on Instagram

 

When you become the pose. Or has the pose become you?

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan) on

अलीकडेच ‘ग्रीक गॉड’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता हृतिक रोशनचा ‘आशियातील सर्वात सेक्सी पुरुष २०१९’च्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

The calm before the storm? Cause the real #War is just about to begin.

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan) on

 मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिटनच्या इस्टर्न आय या मॅगझिनने ‘आशियातील सर्वात सेक्सी पुरुषा’च्या नावासाठी ऑनलाइन पोल घेतला होता. यामध्ये बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनला सर्वाधिक मते मिळाली आहेत. गेल्या दहा वर्षांमधील सर्वाधिक मते मिळवत हृतिकने ‘आशियातील सर्वात सेक्सी पुरुष २०१९’चा मान मिळवला आहे.

 

View this post on Instagram

 

if I think I look good , does that make me look bad ?. . #weirdideas #curiousmind #whattodo #itactuallymakessense

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan) on


दरम्यान, हृतिकने सोशल मीडिया पोस्टद्वारे सर्वांचे आभार मानले आहेत. ‘सर्वप्रथम मला मत दिलेल्यांचे मनापासून आभार. एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीमध्ये व्यक्तीचे दिसणे माझ्यासाठी महत्त्वाचे नसते. मी एखाद्या व्यक्तीच्या दिसण्यावरुन परिक्षण करत नाही. त्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यात काय मिळवले आहे, त्याचा जीवन प्रवास कसा होता आणि एखाद्या गोष्टीला ती व्यक्ती कशी सामोरी जाते हे मी पाहतो’ असे तो म्हणाला आहे.

हृतिकला बॉलीवूडमध्ये येऊन 19 वर्षे पूर्ण झाली. पण त्याच्या हॅन्डसम लूकची क्रेझ अजूनही युवा वर्गात आहे. यापूर्वी, “टॉप फाइव्ह मोस्ट हॅन्डसम मेन इन द वर्ल्ड’ या यादीमध्ये हृतिक रोशनने स्थान पटकावला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.