धनकवडी, दि. 2 (प्रतिनिधी) -खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांवर भर देण्यात आला. खडकवासला मतदारसंघात 75 ठिकाणी विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आले होते. यामध्ये आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, हाडांची तपासणी व उपचार, शासन आपल्या दारी उपक्रम,रिक्षाचालकांना सीएनजी कूपन वाटप, महिला साडी वाटप, अनाथ आश्रमात धान्य वाटप, बांधकाम कामगारांचा विमा काढणे, वृद्धाश्रमामध्ये फळ वाटप, लाडू प्रसाद वाटप, जॉगिंग ट्रॅक स्वच्छता, आधार कार्ड दुरुस्ती, कीर्तन सोहळा, 500 लोकांना काशी दर्शन, नेत्र तपासणी/चष्मा वाटप असे विविध उपक्रम राबविण्यात आले. चैतन्य नगर, धनकवडी, भारती विद्यापीठ, आंबेगाव पठार परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.
यावेळी दिवसभर पूर्ती हॉल येथे अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती. यावेळी आमदार भीमराव तापकीर, माजी नगरसेविका वर्षा तापकीर, मोहिनी देवकर, सचिन बदक, अभिषेक तापकीर, अरुण राजवाडे, तेजश्री बदक, महेश भोसले, सत्यवान कामठे, आप्पा ढावणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.