नवी दिल्ली – सन 2022 मध्ये एचसीएल या कंपनीचे संस्थापक शिव नादर यांनी 1,161 कोटी रुपयांची म्हणजे दिवसाला तीन कोटी रुपयांची देणगी दिली आहे. देणगी देण्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या विप्रोचे संस्थापक अजीम प्रेमजी यांनी गेल्या वर्षी 484 कोटी रुपयांची देणगी दिली. तिसऱ्या क्रमांकावरील मुकेश अंबानी यांनी 411 कोटी रुपयांची देणगी दिली.
चौथ्या क्रमांकावरील कुमार मंगलम बिर्ला यांनी 242 कोटी रुपये, पाचव्या क्रमांकावरील सुष्मिता बागची यांनी 213 कोटी रुपये, सहाव्या क्रमांकावरील राधा पार्थसारथी यांनी 213 कोटी रुपये, सातव्या क्रमांकावरील गौतम अदानी यांनी 190 कोटी रुपये, आठव्या क्रमांकावरील अनिल अग्रवाल यांनी 165 कोटी रुपये, नवव्या क्रमांकावरील नंदन निलेकणी यांनी 169 कोटी रुपयांची तर दहाव्या क्रमांकावरील ए एम नाईक यांनी 142 कोटी रुपयांची देणगी दिली आहे.
रोहिणी निलेकणी यांनी महिला वर्गात सर्वात जास्त म्हणजे 120 कोटी रुपयांची देणगी दिली. लीना गांधी यांनी 21 कोटी आणि अनु आगा यांनी 20 कोटी रुपयांची देणगी दिली. यातील बहुतांश लोकांनी शिक्षणासाठी देणगी दिली आहे. तर काही लोकांनी आरोग्य क्षेत्र आणि सांस्कृतिक कार्यासाठी देणगी दिल्याची आकडेवारी समोर आली आहे.