वाघोली (प्रतिनिधी) : केसनंद तालुका हवेली या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून या वाढत्या लोकसंख्येच्या विविध समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात येत असून याच उपक्रमाचा एक भाग म्हणून डेन्फोस पॉवर सोल्यूशन यांच्या सहकार्याने ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कचरा संकलन करण्यासाठी दोन गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची माहिती सरपंच नितीन गावडे यांनी दिली.
प्रमुख मान्यवरांच्या हस्ते कचरा संकलन करणाऱ्या गाड्यांचे पूजन ग्रामपंचायतीच्या ताब्यात गाड्या देण्यात आल्या.
यावेळी माजी सरपंच मिलिंद नाना हरगुडे,बिनू अँटनी, सुझान मॅडम, जयंत नातू, जुबेर नाईकवाडी, माजी उपसरपंच सचिन जाधव, माजी सरपंच तानाजी हरगुडे,गुलाब हरगुडे शंकर काका वाबळे,माऊली हरगुडे,प्रकाश जाधव,ग्रामपंचायत सदस्य प्रमोद हरगुडे,तानाजी बांगर,दत्तात्रय हरगुडे,सचिन हरगुडे, विशाल हरगुडे,सुभाष बांगर,बाबासाहेब हरगुडे, दिलीप हरगुडे,ढवळे भाऊसाहेब, तुकाराम वाबळे,मल्हारी भंडलकर,वसंत नाना हरगुडे दशरथ वाव्हळ, आदी मान्यवर उपस्थित होते.