मुंबई – बॉलिवूडचा रिअल बागी म्हणून ओळखला जाणारा अभिनेता ‘टायगर श्रॉफ’चा आज वाढदिवस आहे. 2 मार्च 1990 रोजी टायगरचा मुंबईत जन्म झाला. सध्या टायगरला बॉलिवूडचा अॅक्शन हिरो म्ह्णून ओळखले जाते.
View this post on Instagram
डॅड ‘जॅकी श्रॉफ’ यांच्या पावलावर पाऊल टाकत टायगर बॉलिवूडमध्ये आला. साजिद नाडियाडवाला यांच्या ‘हिरोपंती’ चित्रपटातून टायगरने आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. या चित्रपटात टायगर बरोबर अभिनेत्री ‘क्रिती सेनन’ देखील मुख्य भूमिकेत दिसून आली.
View this post on Instagram
दरम्यान, टायगरचे खरे नाव ‘जय हेमंत श्रॉफ’ असे आहे. जॅकी श्रॉफ यांचा लहान भाऊ जय हेमंत याच्या नावावरून त्याचे नाव ठेवण्यात आले होते. जॅकी श्रॉफ यांनी खूप लहान वयात या भावाला गमवले होते.
View this post on Instagram
तसेच, कृती सेननने टायगर श्रॉफबरोबर “हिरोपंती’मधून ऍक्टिंग करिअरला सुरुवात केली होती. आता टायगर श्रॉफ आणि कृती सेनन पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. टायगर श्रॉफचा आगामी सिनेमा “गणपत- पार्ट 1′ मध्ये कृती सेनन लीड रोल करणार आहे. या नव्या ऍक्शनपटाचे मोशन पोस्टर रिलीज झाले आहे.