पूजा चव्हाणचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आला समोर; खळबळजनक माहिती उघड

मुंबई – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण सध्या राजकारणात चांगलेच चर्चेत आले आहे. विदर्भातील शिवसेनेचे मोठे नेते संजय राठोड यांचे नाव या प्रकरणात समोर आल्यापासून भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे.  यातच  या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. पूजा चव्हाणचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, यावर प्रकाश टाकणारा वैद्यकीय अहवाल पुण्यातील वानवडी पोलिसांना मिळाला आहे.

यानुसार, पूजाच्या आत्महत्येच्या किमान मुळ कारणापर्यंत पोहोचू शकणारा सविस्तर शवविच्छेदन अहवालही वानवडी पोलिसांना प्राप्त झाला आहे. ज्यामध्ये तिच्या मणक्‍याला आणि डोक्‍याला जबर दुखापत झाल्यामुळेच मृत्यु झाल्याचे कारण समोर येत आहे.  असं शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

दरम्यान,  या प्रकरणावरून अनेक गंभीर आरोप असलेले वनमंत्री संजय राठोड यांनी रविवारी अखेर मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपविला आहे. मागील २० दिवसांपासून या प्रकरणावरून वाद सुरू आहे. आता चव्हाण कुटुंबीयांतच वाद सुरू झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे. पीडितेची आजी म्हणून समोर आलेल्या शांताबाई चव्हाण यांच्याविषयी सत्य समोर आल्यानंतर त्यांनी आता पूजाच्या माता-पित्यावर आरोप केले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.