मुंबई – कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस मोठ्या प्रमाणात पसरायला सुरुवात झाली आहे. खबरदारी म्हणून सरकारने तातडीने शाळा-कॉलेज बंद केले असून, चित्रपटांचं चित्रीकरण आणि प्रमोशनही काही काळ थांबवले आहे. एवढेच नव्हे ऑफिसेसमध्ये देखील अनेक ठिकाणी वर्क फ्रॉम होम देण्यात आले.
दरम्यान, या प्राणघातक विषाणूपासून सुरक्षित राहण्यासाठी कलाक्षेत्रातील अनेक कलाकार पुढे सरसावले आहेत. नुकतंच, मराठी कलाकार ‘नंदेश उमप’ यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर ‘करोना’ची जनजागृती करणारा सुंदर पोवाडा शेअर केला आहे. ‘माणूस जपा… माणूस जगवा’ असं कॅप्शन सुद्धा त्यांनी दिलं आहे.