कोलकाता- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा अनेक पर्यटन स्थळांवर परिणाम झाला आहे. सिरिगुरी हे पश्चिम बंगालमधील महत्वाचं पर्यटन स्थळ आहे. त्याठिकाणी सुद्धा शुकशुकाट बघायला मिळतो आहे.
“मला रोज कमीत कमी 25 ते 30 गाडीच्या बुकींग असायच्या मात्र कोरोनामुळे पर्यटकांनी सिरीगुरीकडे पाठ फिरवली आहे. आता 2 किंवा 3 रोगच्या बुकींग मिळतात”, असं तेथील वाहन चालकांचं म्हणणं आहे.
दरम्यान, भारतात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे पर्यटनालाच नाही तर अनेक क्षेत्राला फटका बसण्याची शक्यता आहे.