प्रशासकीय इमारतीच्या पार्किंगमध्ये पडलंय

पराग शेणोलकर

कराडमध्ये महत्त्वाच्या फाइल्स व कागदपत्रे बेवारस; पेट्या, शिक्‍के, सील “रामभरोसे’

कराड  – निवडणुकीसारख्या संवेदनशील कामातही कराड महसूल विभागाचा असंवेदनशील कारभार समोर आला आहे. निवडणुकीसाठी लागणारे साहित्य, लखोटे, साहित्यवाहू पत्र्याच्या पेट्या, महत्त्वाचे आदेश असलेल्या फाइल्स, मतपत्रिका, मतदान यंत्रे सील करण्याचे साहित्य, आयोगाने निश्‍चित केलेली मुद्रा असलेले शिक्के येथील नवीन प्रशासकीय इमारतीच्या पार्किंगमध्ये उघड्यावर पडले आहेत. महसूल विभागाच्या जबाबदारीवर असलेले हे साहित्य रामभरोसे पडले आहे.

भारतीय लोकशाहीत निवडणूक प्रक्रियेला प्रचंड महत्त्व आहे. संसद ही देशाची सर्वोच्च संविधानिक संस्था असून लोकसभा व राज्यसभा ही दोन सदने आणि राज्यांसाठी विधानसभा, विधान परिषद अशी रचना आहे. त्यानंतर महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. या संस्थांच्या निवडणुकांची जबाबदारी केंद्रीय व राज्य निवडणूक आयोगावर आहे. लोकसभेला जिल्हाधिकारी, विधानसभेला प्रांताधिकारी तर अन्य निवडणुकांना तहसीलदार व सहकारातील निवडणुकांसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नियुक्‍त केलेले निवडणूक निर्णय अधिकारी काम पाहतात.

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार निष्पक्षपाती निवडणुका घेण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर आहे. निवडणुकांसाठी लागणारे साहित्य आयोगाच्या आदेशानुसार वापरले जाते. यासाठी आयोगाने केलेले नियम व आदेशाचे तंतोतंत पालन बंधनकारक आहे. साहित्य वापरण्याचे आदेश आहेत, त्याचप्रमाणे वापरलेले व न वापरलेले साहित्य सुरक्षित जमा करून स्ट्रॉंगरूममध्ये ठेवण्याचे आदेश आहेत. या आदेशाचे आजपर्यंत पालन होत आले आहे.

कराड तालुक्‍यात मात्र निवडणुकीसारख्या संवेदशील कामातही महसूल विभाग असंवेदनशील असल्याचे समोर आले आहे. लोकसभा व एका साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी लागणारे व वापरलेले निवडणूक साहित्य नवीन प्रशासकीय इमारतीच्या पार्किंगमध्ये उघड्यावर पडले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.