हरियाणात ‘आप-जेजेपी’ आघाडीची मुहूर्तमेढ; जागावाटपाचे चित्र देखील स्पष्ट

हरियाणा : आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाने आज हरियाणातील प्रादेशिक पक्ष असलेल्या जननायक जनता दलाशी हात मिळवणी करत असल्याचे आज स्पष्ट केले. आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्या अनेक प्रयत्नांनंतर देखील काँग्रेसने आम आदमी पक्षाशी आघाडी करण्यास तयारी न दर्शवल्याने अखेर आज आम आदमी पक्ष आणि जननायक जनता पक्षाने आघाडी जाहीर करत जागावाटपाचे चित्र देखील स्पष्ट केले.

तत्पूर्वी, आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये जर काँग्रेस-आम आदमी पक्ष व जननायक जनता पक्षाने आघाडी केल्यास हरियाणातील लोकसभेच्या सर्वच्या सर्व जागा आपण जिंकू असा विश्वास व्यक्त करत ‘आप’चे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेस अध्यक्षांना आघाडीसाठी हाक दिली होती मात्र दिल्ली काँग्रेसमधील नेत्यांनी आम आदमी पक्षासोबत जाण्यास नकार दर्शवल्याने शेवट काँग्रेस नेतृत्वाला ‘आप’सोबत आघाडी न करण्याचा निर्णय घयावा लागला होता.

दरम्यान, आता आम आदमी पक्ष व द्यूष्यांत चौटाला यांच्या जननायक जनता पक्षाने आघाडी केली असून आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये हरियाणातील लोकसभेच्या १० जागांपैकी ३ जागांवर आम आदमी पक्ष निवडणूक लढवणार असून उर्वरित ७ जागांवर जेजीपी निवडणूक लढवणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.