#IPL2019 : पराभवाचा बदला घेण्याची कोलकाताला संधी; रसेल विरुद्ध रबाडा सामना रंगणार

कोलकाताला परभूत करून दिल्लीला विजयीमार्गावर परतण्याची संधी

-रसेल विरुद्ध रबाडा सामना रंगणार
-दिल्लीच्या सलामीवीरांना चांगली कामगिरी करण्याची गरज

कोलकाता  – आयपीएलच्या बाराव्या मोसमात सर्वात समतोल कामगिरीने प्रभावीत करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्ससमोर आज दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान असून पहिल्या सामन्यातील पराभवाचा वचपा काढण्याची संधी कोलकाताकडे असणार आहे. तर, कोलकाताला पराभुत करत विजयी मार्गावर परतण्याची संधी दिल्लीच्या संघाकडे असणार आहे.

यंदाच्या मोसमात कोलकाताने सहा सामन्यांमध्ये 4 विजय आणि दोन पराभवांसह आठ गुण मिळवत गुणतालिकेत दुसरे स्थान गाठले आहे. यावेळी त्यांनी आपल्या आठ सामन्यांमध्ये हैदराबाद, पंजाब, बंगळुरू आणि राजस्थानचा पराभव केला आहे. तर, त्यांना चेन्नई आणि दिल्ली विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर, दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने यांदाच्या मोसमात सहा सामन्यांमध्ये तीन विजय आणि तीन पराभव पत्करत सहा गुणांसह सहावे स्थान मिळवलेले असून त्यांनी मुंबई, कोलकाता आणि बंगळुरूचा पराभव केला आहे. तर, त्यांना हैदराबाद पंजाब आणि चेन्नई विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे.

आजचा सामना

कोलकाता नाईट रायडर्स वि. दिल्ली कॅपिटल्स

वेळ – रात्री 8 वाजता

स्थळ -ईडन गार्डन मैदान,कोलकाता.

यावेळी दिल्ली आणि कोलकाता दरम्यान झालेल्या पहिल्या सामन्यात दिल्लीच्या संघाने कोलकाताचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला होता. ज्यात त्यांनी कोलकातासमोर एका षटकात 11 धावांचे आव्हान ठेवले होते. यावर कोलकाताला केवळ 7 धावाच करता आल्या होत्या. यावेळी कोलकाताकडून प्रसिध कृष्णाने गोलंदजी केली होती. तर, दिल्ली कडून कगिसो रबाडाने गोलंदाजी करत दिल्लीच्या विजयावर शिक्‍का मोर्तब केला होता.

त्या सामन्यात कोलकातानेप्रथम फलंदाजी करताना आंद्रे रसेल आणि कर्णधार दिनेश कार्तिकच्या अर्धशतकांच्या बळावर 185 धावा करत दिल्लीसमोर विजयासाठी 186 धावांचे आव्हान ठेवले होते. यावर प्रत्युत्तरात खेळणाऱ्या दिल्लीने पृठ्‌वी शॉच्या 99 धावांच्याबळावर 185 धावा करत सामना बरोबरीत राखल्यानंतर सामन्याचा निकाल सुपर ओव्हर मधील कामगिरीद्वारे निश्‍चीत झाला.

तसेच कगिसो रबाडा विरुद्ध आंद्रे रसेल अशा प्रकारचे चित्र देखील आजच्या सामन्यात वर्तविण्यात आले आहे. कारण कगिसो रबाडाने यंदाच्या मोसमात 11 बळी मिळवून पर्पल कॅप आपल्याकडे राखली असून रसेलाने सर्वच गोलंदाजांना मनसोक्त झोडपले आहे. मात्र, या आधीच्या सामन्यात रबाडाने रसेलला बोल्ड करत सामन्यात दिल्लीचा विजय निश्‍चीत केला होत. त्यामुळे आज रसेल रबाडाला कशा प्रकारे सामोरा जातो हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे. तर, रबाडा रसेल विरुद्ध कोणती रणनिती आखतो हे देखील पहाणे औत्सुक्‍याचे असेल.

प्रतिस्पर्धी संघ –

कोलकाता नाईट रायडर्स – दिनेश कार्तिक (कर्णधार), रॉबिन उथप्पा, क्रिस लिन, आंद्रे रसेल, सुनील नारायन, शुबमन गिल, पियूष चावला, कुलदीप यादव, प्रसिद कृष्णा, शिवम मावी, नितेश राणा, रिंकू सिंह आणि कमलेश नागरकोटी, कार्लोस ब्रॅथवेट, लोकी फर्ग्युसन, एनरिच नॉर्च, निखिल नाइक, हॅरी गर्नी, पृथ्वी राज यारा, जो डेनली, श्रीकांत मुंढे.

दिल्ली कॅपिटल्स – श्रेयस अय्यर (कर्णधार), शिखर धवन, ऋषभ पंत, अमित मिश्रा, आवेश खान, हर्षल पटेल, राहुल तेवतिया, जयंत यादव, मनजोत कालरा, कॉलीन मुनरो, कगिसो रबाडा, संदीप लामिचाने आणि ट्रेंट बोल्ट, हनुमा विहारी, अक्षर पटेल, ईशांत शर्मा, अंकुश बॅंस, नाथू सिंह, कॉलिंग इंग्राम, शरफेन रदरफोर्ड, किमो पाउल, जलज सक्‍सेना, बंडारु अय्यप्पा.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.