कर्नाटक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटकातील कोप्पाल येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना सत्ताधारी काँग्रेस-जेडीएस पक्षावर घणाघाती टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री तथा माजी पंतप्रधान देवे गौडा यांचे पुत्र कुमारस्वामी यांच्यावर निशाणा साधताना, “२०१४मध्ये देवे गौडा यांनी मोदी पंतप्रधान झाले तर राजकारण सोडून देईल असं म्हंटल होतं. आता यावेळी त्यांचे पुत्र कुमारस्वामी म्हणतायेत की २०१९ला मोदी पंतप्रधान झाले तर राजकारण सोडून देईल मात्र २०१४ला पित्याने दिलेला शब्द पाळला नाही आता २०१९मध्ये पुत्र शब्द पाळेल का?” असं वक्तव्य करीत २०१९मध्ये आपणच पुन्हा एकदा पंतप्रधान पदावर विराजमान होऊ असा विश्वास त्यांनी दर्शवला.
यावेळी बोलताना पंतप्रधानांनी काँग्रेस व जेडीएस पक्षावर घराणेशाहीचा आरोप लावला. ते म्हणाले, “काँग्रेस व जेडीएस हे पक्ष जेवढे जनतेपासून तुटलेले आहेत तेवढेच ते आपल्या परिवाराच्या स्वार्थासाठी जुळलेले आहेत. ते स्वतःचा स्वार्थ, परिवाराचा स्वार्थ या गोष्टींना प्राथमिकता देतात आणि ‘कमिशन’ घेणं हेच त्यांच ‘मिशन’ आहे.”
PM in Koppal: Congress-JDS dono hi party janta se jitni kati hui hai utni hi sirf aur sirf apne parivar se judi hui hai. Inke liye aapki aavshyaktaein, iski unko parwah nahi. Unki prathmikta hai khud ka swaarth, parivar ka swarth aur unka mission kya hai? Commission. #Karnataka pic.twitter.com/I5ihBeetJ0
— ANI (@ANI) April 12, 2019