नवी दिल्ली – ग्रीसमध्ये पार पडलेल्या जागतिक ज्युनिअर वेट लिफ्टिंग स्पर्धेत भारताचचे प्रतिनिधित्व करत असलेल्या पुण्याच्या नवोदीत महिला खेळाडू हर्षदा गरुड ( Sharad Garud ) हीने विजेतेपद पटकावले. आंतरराष्ट्रीय वेट लिफ्टिंग महासंघाने आयोजित केलेल्या जागतिक वेट लिफ्टिंग स्पर्धेत हर्षदाने विजेतेपदाच्या लढतीत सुवर्णपदकाला गवसणी घातली.
तीने या स्पर्धेत स्नॅचमध्ये 70 व क्लिन आणि जर्कमध्ये 83 किलो मिळून एकूण 150 किलो वजन उचलताना 45 किलो वजनी गटात हा मान मिळवला. तुर्कीच्या बेकटास चांन्सुला रजत पदकावर समाधान मानावे लागले.
क्लिन व जर्क प्रकारात बेकटासने हर्षदापेक्षा जास्त सरस कामगिरी करत 85 किलो वजन उचलले होते. मात्र, तीला एकूण गुणांत हर्षदाने पराभूत केले. केवळ 3 किलोच्या फरकाने तीचे सुवर्णपदक हुकले. केवळ 18 वर्षांच्या हर्षदाने 2020 साली आसियाई स्पर्धेत 139 किलो वजनाची नोंद करत ब्रॉंझपदक मिळवले होते.