नवी दिल्ली : दिल्लीच्या हर्ष गुप्ताने राष्ट्रीय नेमबाजी पात्रता स्पर्धेमध्ये २५ मी पिस्तूल प्रकारात ज्युनियर व वरिष्ठ अशा दोन्ही गटांमध्ये सुवर्णपदक पटकावले.
स्पर्धेत हर्षने वरिष्ठ गटामध्ये ५७४ गुणांची कमाई केली. तर उदयवीर आणि विजयवीर हे जुळे बंधू या गटात अनुक्रमे दुस-या व तिस-या स्थानावर राहिले.
स्पर्धेच्या ज्युनियर गटामध्येही २५ मी पिस्तूल प्रकारात हर्ष गुप्ताने अव्वल राहत सुवर्णपदक तर उदयवीरने रौप्यपदक आणि विजयवीरने कांस्यपदक पटकावले.