गुगल मॅप्स झाला १५ वर्षांचा!

सीईओ सुंदर पिचाई यांनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली – इंटरनेटवरील सर्वात मोठे आणि सर्वव्यापी असलेले सर्च इंजिन गुगलचे प्रमुख वैशिष्ट्य असलेल्या “गुगल मॅप्स’ने आज आपल्या सेवेची 15 वर्षे पूर्ण केली आहेत. नवख्या शहरात पत्ता शोधणायाला मदत करणारे गुगल मॅप्स आता कार ड्रायव्हर कंपन्या, घरपोहोच अन्न व वस्तू पुरवणाऱ्या कंपन्यांसह विवाह समारंभ अथवा पर्यटन केंद्रे शोधण्यासाठी अत्यंत उपयोगाचे ठरत आहे. गुगल मॅप्सच्या 15 व्या वर्धापन दिनानिमित्त “गुगल’ आणि “अल्फाबेट’ या कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ), भारतीय वंशाचे सुंदर पिचाई यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

सुरुवातीला अगदी मर्यादित वापर असलेल्या “गुगल मॅप्स’वर फारसा अचूक डाटा नसल्याने त्याकडे इंटरनेट वापरकर्त्यांचे दुर्लक्ष झाले होते. मात्र, वर्ष 2006 मध्ये स्थापन झालेल्या या सेवेमध्ये अनेक वर्षे डाटा अपडेट करण्यात आल्यानंतर वर्ष 2012 पासून “गुगल मॅप्स’चा वापर खूपच वाढला.

केवळ एखाद्या ठिकाणी कसे जायचे याची दिशा दाखवणे एवढे एकच काम करण्यासाठी “गुगल मॅप्स’ आता नसून, बंद रस्ते, रस्त्यावरील सध्याची वाहतूक स्थिती, पर्यायी मार्ग, त्याला लागणारा वेळ, रस्ता वन वे आहे की नाही अशा विविध माहिती मिळतातच. शिवाय परिसरात हॉटेल, मंदिर, एटीएम, पेट्रोल पंप, हॉस्पिटल कुठे आहे, तिथे कसे जायचे, संबंधित ठिकाण तुम्हाला हव्या त्या वेळेत सेवा देऊ शकणार आहे की नाही, अशा प्रकारची माहितीही मिळते.

Leave A Reply

Your email address will not be published.