अहमदाबाद – डिसेंबरमध्ये होणाऱ्या गुजरात विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेऊन 2015 च्या विसनगर दंगल प्रकरणाच्या याचिकेवर तातडीची सुनावणी व्हावी अशी मागणी करणारी याचिका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हार्दिक पटेल यांनी गुजरात उच्च न्यायालयात केली आहे.
हार्दिक पटेल यांच्या वकिलाने सोमवारी न्यायमूर्ती बीएन कारिया यांच्या खंडपीठापुढे एक याचिका सादर करून या प्रकरणाच्या तातडीच्या सुनावणीची मागणी केली.
जुलै 2018 मध्ये, मेहसाणा जिल्ह्यातील विसनगर येथील सत्र न्यायालयाने पटेल यांना 2015 मध्ये पाटीदार कोटा आंदोलनादरम्यान विसनगर मध्ये झालेल्या दंगल आणि जाळपोळ केल्याप्रकरणी दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.त्यांच्या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. निवडणूक लढवण्यास पात्र ठरण्यासाठी ही शिक्षा ही हार्दीक पटेल यांच्यासाठी एक अडचण ठरत आहे.