करोनाबाबत पूर्वीच ऐकले होते : हरभजन

नवीदिल्ली – चीनसह जगभरात पसरलेल्या करोना विषाणूंमुळे झालेल्या उत्पात भयानकच आहे, पण करोना विषाणूंबाबत आत्ताच नव्हे तर दोन वर्षांपूर्वीच ऐकले होते, असा धक्कादायक दावा क्रिकेटपटू हरभजनसिंग याने केला आहे. हरभजनने करोनाबाबत तपशीलवार सांगताना 2018 सालचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे व आपल्या वक्तव्याला पुष्टी दिली आहे.

करोना विषाणूंचा प्रसार चीनकडून झाला असला तरीही एखाद्या प्रयोग शाळेत हा विषाणू तयार केला जात नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. दोन वर्षांपूर्वीच करोनाबाबत ऐकले होते. माय सिक्रेट टेरियस या वेबसिरीजमध्ये करोनाचा उल्लेख आहे, तुम्ही व्हिडीओमध्येही पाहू शकता, असे हरभजनने ट्‌विटरवर पोस्ट केले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.