नवी दिल्ली – आयटी आउटसोर्सिंग क्षेत्रातील बंगळुरू येथील कंपनी हॅपिएस्ट माईंडस् टेक्नॉलॉजीज या कंपनीचा आयपीए सोमवार दि. 7 सप्टेंबरपासून खुला होणार आहे.
या कंपनीची स्थापना अशोक सुता यांनी केली आहे. आयपीओसाठी 165 ते 166 असा किंमत पट्टा ठेवण्यात आला आहे. सुता हे कंपनीचे प्रवर्तक आहेत. त्यांच्याकडील 84.14 लाख शेअर ते विकणार आहेत. त्याचबरोबर कंपनीतील गुंतवणूकदार सीएमडीबी हा खासगी इक्विटी फंडाकडे कंपनीचे 19.4 टक्के शेअर आहेत. हा फंड स्वतःची गुंतवणूक काढून घेणार आहे.
या फंडाचे व्यवस्थापन जेपी मॉर्गन इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट कंपनीतर्फे पाहिले जाते. बाकीचे शेअर कंपनीचा कर्मचारी ट्रस्ट आणि इतरांकडे आहेत. या आयपीओ द्वारे कंपनीने 702 कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.