Exicom Tele-Systems Limited IPO – एक्झिकॉम टेली सिस्टम्स कंपनीचा आयपीओ किरकोळ गुंतवणूकदारांना 27 फेब्रुवारीपासून बोली बोलण्यास उपलब्ध झाला आहे. यातून कंपनी 329 कोटी रुपये उभारणे अपेक्षित आहे.
आयपीओद्वारा (IPO) उपलब्ध असलेल्या शेअरची किंमत 135 ते 142 रुपये प्रति शेअर आहे. किमान शंभर शेअरसाठी आणि त्यानंतर शंभरच्या पटीत बोली बोलता येणार आहे. सर्व सामान्य गुंतवणूकदारांना 29 फेब्रुवारीपर्यंत बोली बोलता येणार आहे.
या माध्यमातून निर्माण झालेल्या निधीचा उपयोग कंपनी भांडवली खर्चासाठी वापरणार असल्याचे सांगण्यात आले. अँकर गुंतवणूकदारासाठी बोलीची तारीख 26 फेब्रुवारी होती.