सुखी वैवाहिक जीवन सर्वांनाच आवडते आणि लोक आपल्या वैवाहिक जीवनाला सुखी ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. आजकाल सगळे सोशल मीडियावर आपल्या आयुष्याचे सुख दुःख सामायिक करतात. आपले फोटो सामायिक करतात. जास्त वेळ सोशल मीडियावर घालवतात. परंतु, हैप्पी कपल किंवा सुखी आणि आनंदी जोडपे असे काही न करता ते एकमेकांसह वेळ घालवणे जास्त पसंत करतात.
सोशल मीडियावर मिळणाऱ्या लाईक्स आवडत नाही
बरीच जोडपी आपल्या खासगी क्षणाच्या फोटोंना किंवा कुठेतरी जाण्याचे फोटो सोशल मीडियावर सामायिक करतात. अशा लोकांना त्या फोटो साठी किती लाईक्स किंवा कॉमेंट आले ह्याची काळजी असते. परंतु आनंदी जोडपं सोशल मीडिया प्रोफाइल वर आपल्या सर्व काही अपडेट करत नाही त्यांना मिळणाऱ्या लाईक्स किंवा कॉमेंट्सची काळजी नसते.त्यांना आवडत नाही की लोकांनी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल काही बोलावं.
कोणाशीही तुलना करत नाही
असे लोक किंवा जोडपे आपल्या जीवनाची तुलना इतर लोकांशी करत नाही. दुसरे आपल्या आयुष्यात किती आनंदी आहे असं विचार करणे खूप सोपं आहे परंतु आपल्याला त्यांच्या खासगी आयुष्या बद्दल काहीच माहित नसते. म्हणून कोणाच्या आनंदी फोटोला बघून असा विचार करू नका की समोरचा किती आनंदी आहे. सुखी आणि आनंदी जोडपं फक्त आपल्या नात्यात आनंदी असतात. ते कोणाशी देखील तुलना करत नाही.