पुणे : भारताचा गोलंदाज एस श्रीसंत 6 फेब्रुवारी रोजी त्याचा 39 वा वाढदिवस साजरा करत आहे. आयपीएलमधील मॅच फिक्सिंगच्या आरोपानंतर सात वर्षांची बंदी पूर्ण केल्यानंतर श्रीसंतने देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. त्याने अलीकडेच सय्यद अली मुश्ताक अली ट्रॉफी 2021 मध्ये केरळचे प्रतिनिधित्व केले.
श्रीसंत दोन विश्वचषक विजेत्या भारतीय संघांचा भाग आहे आणि 2007 टी20 विश्वचषक आणि 2011 एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळला आहे. श्रीसंत त्याचा 39 वा वाढदिवस साजरा करत असताना, श्रीसंतच्या कारकिर्दीतील 3 सर्वोत्तम कमगिरींवर प्रकाश टाकणार आहोत.
1) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामन्यात 8 बळी (2006)
दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्याच दौर्यात श्रीसंत त्याच्या कामगिरीमुळे स्टार झाला. 2006-07 कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीत भारताचा पहिला डाव 249 धावांत आटोपला होता. यामध्ये सौरव गांगुलीने 51 धावा ठोकल्या. व्हीआरव्ही सिंगच्या 19 चेंडूत 27 धावांमुळे भारत सर्वबाद 249 धावा करु शकला.
त्यानंतर फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिकेचा श्रीसंतन धुव्वा उडावला. केरळच्या वेगवान गोलंदाजाने दक्षिण आफ्रिकेच्या जवळपास प्रत्येक फलंदाजाला जेरीस आणले होते. त्याने आपल्या पहिल्याच षटकात ग्रॅमी स्मिथला एलबीडब्ल्यू केले. त्यानंतर हाशिम आमला आणि जॅक कॅलिस यांना त्याने आऊट स्विंगरवर स्लिपमध्ये झेलबाद केले.
श्रीशांतने पहिल्या दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या चारपैकी तीन फलंदाजांना तंबूत धाडले होते. त्याच्या पहिल्या स्पेलच्या सलग 8व्या षटकात त्याने मार्क बाउचरला बाद केले आणि पुढच्या षटकात शॉन पोलॉकला बाद करत पाच बळी पूर्ण केले.
त्याने दुसर्या डावात आणखी तीन बळी घेत सामन्यात 8 बळी पूर्ण केले. ज्यामुळे भारताला प्रसिद्ध विजयाची नोंद करण्यात मदत झाली.
2) हेडन-गलख्रिस्टच्या दांड्या गुल (2007 टी20 विश्वचषक)
कोणालाही अपेक्षा नसताना भारताने 2007 मध्ये पहिल्या टी20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. उपांत्य फेरीत सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी झाला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 188 धावा केल्या. युवराज सिंगच्या 30 चेंडूत 70 धावा आणि एमएस धोनीच्या 18 चेंडूत 36 धावांनी भारताला आव्हानात्मक धावसंख्या उभी करुन दिलीय. पण आयसीसी स्पर्धांमध्ये ऑस्ट्रेलिया नेहमीच भारतापेक्षा सरस होता आणि त्यामुळे भारतावर खूप मोठा दबाव होता.
ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 36/0 पर्यंत मजल मारल्याने चांगली सुरुवात झाली. श्रीशांतने दोन उत्कृष्ट षटके टाकली होती. त्याने स्पेलच्या तिसर्या षटकात धोकादायक अॅडम गिलख्रिस्टला बोल्ड करत भारताला पहिले यश मिळवून दिले.
दुसर्या बाजून मॅथ्यू हेडन आक्रमक फलंदाजी करत होता. हेडन ज्या पद्धतीने खेळत होता ते पहाता ऑस्ट्रेलिया हा सामना जिंकेल असे वाटत होते. अशात श्रीसंतने त्याचे अंतिम षटकात टाकण्यास परत आला आणि हेडनच्या दांड्या गुल करत भारताला समान्यात पुनरागमन करुन दिले. त्यानंतर भारताने 15 धावांनी विजय नोंदवला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला.
3) हॅट्रिक घेणारा केरळचा पहिला गोलंदाज (2004)
2004-05 च्या रणजी हंगामात, स्पर्धेच्या इतिहासात हॅट्रिक घेणारा श्रीसंत केरळचा पहिला गोलंदाज ठरला. नोव्हेंबर 2004 मध्ये केरळचा पलक्कड येथे हिमाचल प्रदेश विरुद्ध सामना होता. पहिल्या दिवसाच्या खेळावर हिमचल प्रदेशच्या फलंदाजांनी वर्चस्व गाजवत 2 बाद 321 धावा केल्या होत्या. श्रीशांत मात्र, दुसर्या दिवशी मैदानावर श्रीसंत नावाचे वादळ घोंगावले.
श्रीशांतने दुसर्या दिवशी प्रथम शतकवीर मनविंदर बिस्ला याला 92 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बाद केले. त्याच्या पुढच्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूंवर, अजय मन्नू आणि पारस डोगरा अनुक्रमे झाले आणि श्रीसंतची हॅट्रिक पूर्ण झाली. हिमचल प्रदेशचा डाव 465 धावांवर संपुष्टात आला. यामध्ये श्रीसंतने पाच बळी घेतले.