नवी दिल्ली – बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा 17 फेब्रुवारीपासून सुरू होणार दुसरा कसोटी सामना भारताचा दिग्गज कसोटीपटू चेतेश्वर पुजारासाठी खास असणार आहे. कारण या दिवशी पुजार आपल्या कसोटी कारकिर्दीतील 100 वा खेळेल.
कसोटी क्रिकेटमध्ये 2010 मध्ये पदार्पण करणार्या पुजाराने आतापर्यंत खेळलेल्या 99 सामन्यांत 44.15 च्या सरासरीने 7021 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 19 शतके आणि 34 अर्धशतके झळकावली आहेत. तसेच त्याने नाबाद 206 ही कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी ठरली आहे. पुजाराच्या शंभराव्या कसोटी सामन्याच्या पर्श्वभूमीवर त्याच्या कसोटी कारकिर्दीतील खास विक्रमांवर प्रकाश टाकणार आहोत.
* सध्या 99 कसोटी सामन्यांसह पुजारा भारतासाठी सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याच्या बाबतीत 13व्या क्रमांकावर आहे. भारताचा माजी खेळाडू मोहम्मद अझरुद्दीनही त्याच्याबरोबर 99 कसोटी सामन्यांसह 13व्या स्थानी आहे. दिल्ली कसोटीत पुजारा शंभरावा कसोटी सामना खेळत तो अझरुद्दीनला मागे टाकेल. सध्या भारताकडून सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याच्या बाबतीत सचिन तेंडुलकर 200 कसोटी सामन्यांसह पहिल्या क्रमांकावर आहे.
* पुजाराने आपल्या कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत एकूण 7021 धावा केल्या आहेत. भारतासाठी सर्वाधिक कसोटी धावा करणार्या फलंदाजांमध्ये पुजारा आठव्या क्रमांकावर आहे. माजी कर्णधार सौरव गांगुली 7212 कसोटी धावांसह सातव्या क्रमांकावर आहे. तर सचिन तेंडुलकर 15921 धावांसह पहिल्या क्रमांकावर आहे.
* कसोटी कारकिर्दीत पुजाराने नाबाद 206 ही सर्वोच्च वैय्यक्तीक धावसंख्या नोंदवली आहे. भारतासाठी सर्वाधिक कसोटी धावसंख्या बनवण्याच्या बाबतीत पुजारा 37व्या क्रमांकावर आहे. भारतासाठी वैय्यक्तीक सर्वोेच्च धावसंख्या वीरेंद्र सेहवागच्या नावावर आहे. सेहवागने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 319 धावांची खेळी केली आहेय.
* कसोटी क्रिकेटमध्ये पुजाराची सरासरी 44.15 आहे. भारतीय क्रिकेटपटूंच्या कसोटी सरासरीच्या बाबतीत पुजारा 11व्या क्रमांकावर आहे. तर विनोद कांबळी 54.20 च्या सरासरीसह पहिल्या क्रमांकावर आहे.
* भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणार्या फलंदाजांमध्ये पुजारा हा 7व्या स्थानी आहे. त्याने आतापर्यंत एकूण 19 शतके झळकावली आहेत.
* सध्या सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये पुजाराने 21 सामन्यांच्या 38 डावांमध्ये 52.77 च्या सरासरीने 1900 धावा केल्या आहेत. ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणारा पुजारा सहावा फलंदाज आहे.
* पुजाराने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये एकूण 15 वेळा 50 चा आकडा पार केला आहे. ट्रॉफीमध्ये सर्वाधिक अर्धशतक झळकावणारा पुजारा चौथा फलंदाज आहे.
* बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये त्याने एकूण 5 शतके झळकावली आहेत. या ट्रॉफीमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारा पुजारा आठवा फलंदाज ठरला आहे.