बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने 8 मे 2018 रोजी आनंद आहुजाशी लग्न करून सर्वांना चकीत केले होते. या दोघांनी लग्नानंतर सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यांच्या लग्नाची नुकतीच ऍनिव्हर्सरी साजरी करण्यात आली. या निमित्ताने मित्र-मैत्रिणींसह निकटवर्तीयांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, सोनमची सासू प्रिया आहुजानेही तिला एक प्रेमळ अशी पोस्ट करत खास शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टमध्ये लिहिले आहे की, प्रिय सोनम-आनंद, लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा! देव तुम्हाला सदैव प्रेम, आनंद आणि सुख देवो. तुमच्यातील प्रेम असेच कायम राहो. आमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमीच आपल्याबरोबर आहेत.
सोनमची सासू प्रिया आहुजाने एक फोटो शेअर करत लिहिले, आम्हाला नेहमीच एक मुलगी हवी होती. अन् तू आमच्या आयुष्यात आली आणि आम्हा सर्वांसाठी आनंद घेऊन आली. तू खूप गोड मुलगी आहेस आणि आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो.
दरम्यान, लॉकडाऊनमुळे सोनम कपूर आपली ऍनिव्हर्सरी साजरी करू शकली नाही. यावेळी तिच्या कुटुंबीयांनी व्हिडीओ कॉल्सच्या माध्यमातून तिला शुभेच्छा दिल्या.