सैफ अली खानचा 50 वा वाढदिवस रविवारी साजरा झाला. करिनाने आपल्या नवऱ्याचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. या सेलिब्रेशनचा व्हिडिओ करिनाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये करिनाकडील गोड बातमीदेखील स्पष्ट दिसते आहे.
सैफ समोर मोठ्ठा बर्थ डे केक ठेवलेलाही दिसतो आहे. या पोस्टबरोबर करिनाने आणखी एक फोटो पोस्ट केला आहे. त्यामध्ये बर्थ डे केकवरील मेणबत्त्यांच्या प्रकाशात सैफ आणि करिनाचे चेहरे उजळून निघालेले दिसत आहेत.
या फोटोला करिनाने एक मस्त कॅप्शनही दिली आहे. हॅपी बर्थ डे टू द स्पार्कल ऑफ माय लाईफ असे तिने या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. याबरोबर रेड हार्ड इमोजीही तिने पोस्ट केल्या आहेत. या बर्थडे पार्टीच्या काही फोटोंना करिनाने इन्स्टाग्रामवरही पोस्ट केले आहे.
सैफच्या फॅन्सनी त्याच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. करिष्मानेही त्याला इन्स्टाग्रामवर शुभेच्छा दिल्या आहेत. हॅपी बर्थ डे सैफ. कूलेस्ट ब्रदर इन लॉ एव्हर असे तिने म्हटले आहे. सैफची बहीण सोहा आणि तिचा नवरा कुणाल खेमू यांनीही या प्रसंगी हजेरी लावून सैफला शुभेच्छा दिल्या. या घरगुती समारंभातूनच सैफने आपला वाढदिवस साजरा केला.