परिंचे -माहूर (ता. पुरंदर) येथील जलाशय पूर्ण क्षमतेने भरून वाहिल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. ग्रामस्थ व माहूर जाई पाणी वापर संस्थेच्या वतीने सरपंच सुनंदा आतकरी, उपसरपंच सुशील चव्हाण व माजी जिल्हा परिषद सदस्य हेमंत कुमार माहुरकर यांच्या हस्ते जलपूजन करून कर्पूर गंगानदीची खणा-नारळाने ओटी भरून आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष शरद जगताप, सहकारी संस्थेचे सचिव राम जगताप, माजी सरपंच हनुमंत माहूरकर, किरण गोळे, सत्यवान गोळे, तुकाराम जगताप, शंकर पवार, रोहिदास गोळे, रमेश जगताप, ग्रामपंचायत सदस्य गजाभाऊ जगताप, संदीप भोसले, अमोल गोळे, अनिल जगताप, उमेश जगताप आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
या जलाशयातून एक हजार क्षेत्राला पाणी मिळत असल्याने येथील शेतकरी बागायदार झाला आहे. येथे 700 एकर क्षेत्रावर उसाचे पीक घेतले जाते. त्याचबरोबर टोमॅटो, कांदा, कोबी व फूल शेती मोठ्या प्रमाणात केली जाते.