मुंबई – अमरावतीच्या खासदार नवनीत राणा राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा हे दाम्पत्य राजद्रोहाच्या आरोपाखाली काही महिन्यांपूर्वी तुरुंगात होते. राणा दाम्पत्याविरोधात १२४ अ कलमानुसार, राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. २३ एप्रिल रोजी राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली होती. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालिसाचे पठण करण्याच्या अट्टहासामुळे राणा दाम्पत्याला अटक कऱण्यात आली होती.
दरम्यान, याप्रकरणी सध्या सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे. न्यायाधीश राहुल रोकडे यांनी मागील सुनावणीवेळी राणा दांपत्याला न्यायालयात हजर राहण्याचा सक्त आदेश दिला होता. त्या आदेशाला अनुसरून दोघांनी बुधवारी न्यायालयात हजर राहणे बंधनकारक होते, मात्र दांपत्य गैरहजर राहिल्याने न्यायालयाने पुन्हा दोघांविरुद्ध पाच हजारांचे जामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे.
त्यामुळे आता पुन्हा एकदा या दाम्पत्याच्या अडचणी वाढणार असल्याचं दिसून येत आहे. यावेळी रवी राणा आणि नवनीत राणा यांना काही काळ पोलीस कोठडीत देखील राहावे लागेल होते. त्यामुळे आता राणा दाम्पत्याला पुन्हा एकदा हनुमान चालिसा पठण प्रकरण चांगलच भोवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
दोघांनी बुधवारी न्यायालयात हजर राहणे बंधनकारक होते, मात्र दांपत्य गैरहजर राहिल्याचं दिसून आलं. त्यामुळे आता १० जानेवारीला पुढील सुनावणी होणार असून त्यावेळी राणा दांपत्य हजर न राहिल्यास दोघांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट निघण्याची शक्यता आहे.