मुंबई – शाहरुखच्या पठाण या चित्रपटावरून मोठा वाद सुरु झाला आहे. नेटकऱ्यांनी दीपिका शाहरुखला जोरदार ट्रोल करायला सुरुवात केली आहे. दीपिकाने परिधान केलेल्या भगव्या ड्रेसअपवरून अनेकांनी सोशल मीडियावर संतापजनक प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली होती. एमपीचे भाजप नेते नरोत्तम मिश्रा यांनी बोल्ड दृश्यांवरून चित्रपटाच्या रिलीजबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण केलं होत. आता काहींनी शाहरुखचे समर्थन करत अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफचे काही फोटो व्हयरल करायला सुरुवात केली आहे.
शाहरुख दीपिकाने केलेल्या कृत्यामुळे तुमच्या भावना दुखावल्या परंतु जेव्हा अभिनेता अक्षय कुमराने भगवी साडी घातलेल्या अभिनेत्रीच्या पोटावर किस केले होते तेव्हा तुमच्या भावना कोठे होत्या असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. यासोबतच नेटकऱ्याने दे दणा दन चित्रपटातील गाण्यातील तो फोटो देखील शेअर केला आहे. एकूणच शाहरुखच्या ट्रोलिंगला आता अक्षय कुमारच्या ट्रोलिंगने उत्तर दिले जात आहे.
क्या आप इस पोज़, ड्रेस से comfortable महसूस कर पा रहे हैं @drnarottammisra actor @akshaykumar actress- katrina Kaif, movie- de dana dan pic.twitter.com/byFsIDiPOa
— Rakesh Ranjan (@cartoonistrrs) December 14, 2022
ट्रोलिंग ही गोष्ट बॉलिवूडसाठी नवी नाही परंतु अशा प्रकारचे काउंटर ट्रोलिंग देखील आता सुरु झाल्याने ही चिंतेची बाबा मनाली जात आहे. आधीच चित्रपटांसारख्या गोष्टींमध्ये राजकरण आणि नेत्यांचा हस्तक्षेप वाढत असल्याने अनेक कलाकार नाराजी व्यक्त करत आहेत. त्यातच आता पठाण चित्रपटाचे हे ट्रोलिंग प्रकरण कधी पर्यंत सुरु राहणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.