काश्‍मिरात हातबॉम्ब हल्ला; 20 जण जखमी

श्रीनगर : जम्मू काश्‍मीरमधील सोपोरे येथील बसस्थानकावर अतिरेक्‍यांनी हातबॉम्ब फेकल्याने 20 जण जखमी झाले. त्यापैकी सहा जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना श्रीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. युरोपीयन महासंघाच्या शिष्टमंडळाच्या काश्‍मिर भेटी आधी एक दिवस हा हल्ला करण्यात आला आहे.

श्रीनगरमध्ये शनिवारी (दि. 26) दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या पथकावर हातबॉम्ब फेकले होते. त्यात सहा जण जखमी झाले होते. त्या पाठोपाठ हा दुसरा तशा स्वरूपाचा दहशतवादी हल्ला करण्यात आला.

या हल्ल्यात किमान 20 जण जखमी झाले, त्यातील सहा जण अत्यवस्थ आहेत, असे काश्‍मीर पोलिसांनी सांगितले. हा प्रदेशात सुरक्षा दलांनी तातडीने नाकाबंदी केली असून हल्लेखोरांना शोधण्यासाठी व्यापक मोहीम राबवण्यात येत आहे. दहशतावादी कृत्ये कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाहीत, असा इशारा सुरक्षा दलांनी दिला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.