Prashant Damle| अभिनेते प्रशांत दामले यांनी नाटकासह अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे. आपल्या विनोदी शैलीने त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आतापर्यंत त्यांनी अनेक नाटकांमध्ये काम केले आहे. नाटकातील त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अभिनयासह प्रशांत दामले सोशल मीडियावर देखील सक्रिय असतात. सध्या त्यांनी एका नेटकऱ्याला दिलेल्या मजेशीर उत्तराची चांगलीच चर्चा रंगली आहे.
नुकतंच प्रशांत दामले यांनी आगामी नाटकांची फेसबुक पोस्ट केली. यावर एका चाहत्याने कमेंट करत लिहिले, ‘सर गंमत म्हणून विचारत आहे, अर्ध्या तिकीटात प्रवेश मिळेल का हो??’ यावर प्रशांत दामलेंनीही ‘नाटक पण अर्धच बघता येईल’, असे मजेशीर उत्तर दिले. प्रशांत दामलेंच्या या कमेंटवर एकाने लिहिलं ,’सर तुमच्या सारखा महान कलाकार ज्या नाटकात अभिनय करत असेल ते नाटक अर्धवट पाहणं शक्य तरी आहे का??’ Prashant Damle|
दरम्यान, अभिनेते प्रशांत दामले यांची नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. याशिवाय त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते संगीत नाटक अकादमी रत्न आणि सदस्यता पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. तसेच नाटकाच्या ऑनलाइन तिकीट बुकिंगसाठी प्रशांत दामले व त्यांच्या सहकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच तिकिटालय हे अॅप सुरू केलं आहे. प्रेक्षकांना या ॲपवर नाटकाची व सिनेमांची तिकीटं बुक करता येणे सोईस्कर झाले आहे. Prashant Damle|
प्रशांत दामले सध्या ‘सारखंच काहीतरी होतंय’ आणि ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकांचे प्रयोग करत आहेत. त्यांच्या या नाटकांना प्रेक्षकांचा देखील मोठा प्रतिसाद मिळत आहे.
हेही वाचा:
सोनम कपूर विचित्र फॅशनमुळे पुन्हा ट्रोल; नेटकरी म्हणाले ‘नाईट ड्रेसवर का फिरते?’