Katewadi Name Plate । राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जेव्हापासून फूट पडली आहे. तेंव्हापासून पवार कुटुंबातील वाद समोर आल्याचे दिसून येत आहे. त्यातच अजित पवारांना संपूर्ण कुटुंबाने एकटं पडल्याचेही बोलले जात आहे. त्यांच्या सख्ख्या भावानेही त्यांची साथ सोडलीय. मात्र असे असले तरी सध्या बारामतीमधील काटेवाडी या अजित पवारांच्या गावी काही चित्र वेगळं दिसत आहे.
‘दादा वहिनी हे तुमचं कुटुंब आम्हीच इथले उमेदवार’ Katewadi Name Plate ।
काटेवाडीतील काही घरांमध्ये ‘दादा वहिनी हे तुमचं कुटुंब आम्हीच इथले उमेदवार’ अशा आशयाच्या पाट्या लावल्याचे दिसत आहे. सुप्रिया सुळे यांचा प्रचार करताना अजित पवारांचं कुटुंब वगळता संपूर्ण पवार कुटुंब हे सुनेत्रा पवार यांच्या विरोधात प्रचार करत आहे. त्यातच काटेवाडीतील काही घरांमध्ये अशा पाट्या लागल्याने याची सर्वत्र चर्चा होत आहे.
काटेवाडीकर हे बारामतीकर Katewadi Name Plate ।
अशा प्रकारचा पाट्या लावण्याविषयी गावकऱ्यांनी माहिती दिली. त्यांनी याविषयी बोलताना,’आम्ही जे आता बोर्ड लावलेले आहेत दादा वहिनी हे तुमचं कुटुंब आणि आम्हीच इथले उमेदवार, असं हे बोर्ड लावले आहे. मागचं कारण हेच आहे की दादांनी या गावचा विकास पण केलेला आहे आणि दादांना असं एकटं पाडलं जात आहे. अजित दादा एकटेच आहेत आणि बाकीचे सर्व कुटुंब विरोधात आहेत तर ते चुकीचं ठरवण्यासाठी किंवा दादांना साथ देण्यासाठी किंवा हे काटेवाडीकर हे बारामतीकर हेच, आम्ही पण तुमच्या कुटुंबातले आहोत आणि आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत हे दाखवण्यासाठी आम्ही हे बोर्ड बोर्ड लावलेले आहेत’, अ गावकरी मिलिंद काटे यांनी सांगितलं आहे.
सुनेत्रा पवार यांनी 2008 आमच्या इथं काटेवाडी ग्रामपंचायतमध्ये काम करताना एक क्रांतिकारक निर्णय घेतला होता की, महिलांचे नाव घरावर असावं. हाच निर्णय आता राज्य शासनाने घेतलेला आहे. आपल्या मुलाच्या पुढे आईचं नाव नंतर वडिलांचं आणि नंतर आडनाव हा जो निर्णय आहे. तो 2008 सालीच काटेवाडीचा ग्रामसभेमध्ये घेतलेला होता. अजित दादा कुटुंबात ते एकटे नाहीत सुनेत्रा वहिनी आणि अजित दादा आणि आम्ही सर्व संपूर्ण गाव त्यांच्या पाठीशी उभा आहोत याची खात्री आम्ही देत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.