Sonam Kapoor Troll| बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर अभिनयासह तिच्या फॅशनमुळे देखील चर्चेत असते. मात्र अनेकदा तिला तिच्या फॅशनमुळे ट्रोल केले जाते. नुकतेच एका इव्हेंटदरम्यान तिने परिधान केलेल्या कपड्यांमुळे तिला पुन्हा एकदा ट्रोल करण्यात आले आहे.
सोनम कपूर बांद्रा येथे एका बुक लॉन्च इव्हेंटमध्ये सहभागी झाली. येथील तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यात सोनमने केलेली फॅशन पाहून नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये सोनमने काळ्या रंगाचा ड्रेस घातलेला आहे. Sonam Kapoor Troll|
View this post on Instagram
मात्र नेटकऱ्यांना तिचा हा ड्रेस आवडलेला नाही. सोनमच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करीत तिला ट्रोल केलं आहे. यावर नेटकऱ्यांनी ‘ही नाईट ड्रेसवर का फिरते?’, ‘हिचा ड्रेसिंग सेन्स कुठे गेला?’, ‘चालता फिरता हॅंगर’, ‘उन्हाळ्यात रेनकोट?’ अशा कमेंट केल्या आहेत. Sonam Kapoor Troll|
सोनमच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर, 2018 मध्ये ती ‘जोया फॅक्टर’ या चित्रपटात दिसली होती. मात्र हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. याशिवाय जिओ सिनेमावर तिचा’ ब्लाइंड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सोनमने 2022 मध्ये एका मुलाला जन्म दिला आणि तेव्हापासून ती मातृत्वाची जबाबदारी पार पाडत आहे. यानंतर ती फारशी कोणत्याही चित्रपटात दिसली नाही.
हेही वाचा:
“ब्रँडेड कपडे खरेदी करणे म्हणजे…”; मृणाल ठाकूरने स्पष्टच सांगितल