नवी दिल्ली – विविध कंपन्यांच्या कर्मचाऱ्याचे एच वन- बी व्हिसा मागणीचे अर्ज अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात फेटाळण्यात येत असल्यामुळे या कंपन्यांच्या कामकाजावर परिणाम होऊ लागला आहे.
इन्फोसिस कंपनीचे 59 टक्के, टीसीएस कंपनीचे पंधरा टक्के, कॉग्नीझंट कंपनीचे 52 टक्के, डेलॉईट कंपनीचे 41 टक्के, ऍक्सेंचर कंपनीचे 31 टक्के व्हिसा नाकारण्यात आला. अमेरिकेतील कंत्राटदाराचे काम पूर्ण करण्यासाठी अमेरिकेत मनुष्यबळ नसल्यामुळे या कंपन्यांनी अमेरिकन सरकारकडे एच वन- बी व्हिसा मागितला होता. या व्हिसाच्या आधारावर भारतीय कर्मचारी अमेरिकेत जाऊन काम करतात. मात्र, अमेरिकेतील मनुष्यबळाचा वापर करावा असे सांगून एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हिसा नाकारण्यात आले आहेत.
यामुळे भारतीय कंपन्यांना अमेरिकेत कुशल मनुष्यबळ घेऊन जाता येणार नाही. त्यामुळे अमेरिकेतील कंपन्यांनी दिलेले काम भारतातील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांना पूर्ण करता येणार नाही.