जयपूर: राजस्थानमधील राजकीय घमासान थांबत नसून दररोज नवीन प्रकरणे समोर येत आहेत. दरम्यान, कॉंग्रेसचे आमदार गिरराजसिंग मलिंगाने सोमवारी आरोप केला की तत्कालीन उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी त्यांच्याबरोबर पक्षांतर करून भाजपमध्ये जाण्यासाठी चर्चा केली होती. यासह आपल्याला पैशांची ऑफर देखील देण्यात आली होती, असा गौप्यस्फोट मलिंगाने माध्यमांसमोर केला.
राज्यातील बारी येथील आमदार मलिंगाने येथे माध्यमांना सांगितले की, आपल्या काही कामांच्या संदर्भात त्यांनी तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष पायलट यांची दोनदा भेट घेतली. यावेळी पायलट यांनी ‘भाजपामध्ये जायचे आहे, पक्ष सोडा’, असे सांगितल्याचे मलिंगा म्हणाले.
मलिंगाच्या म्हणण्यानुसार, यावेळी पायलट यांनी पैशांवरही चर्चा केली. ‘तोंड उघडा तुम्हाला पाहिजे तेवढा पैसा देऊ’ असे पायलट यांनी म्हटले. याचा पुरावा काय आहे, असे विचारले असता मलिंगा म्हणाले, “जर माझा मुद्दा चुकीचा असेल तर पायलट यांनी येऊन सांगावे की मी खोटा बोलत आहे.