जुन्नर : कल्याण-नगर मार्गावरील माळशेज घाटातील बोगद्याजवळ सोमवारी (दि. २०) सकाळी दरड कोसळली आहे. या घटनेत एका चारचाकी वाहनाचे नुकसान झाले असून त्यातील व्यक्ती थोडक्यात बचावले आहेत. या स्विफ्ट डीझायरमध्ये (एमएच ०५-यु २४२३) बसलेले परळीचे पोलीस अधिकारी अशोक देसले जखमी झाले आहेत.
माळशेज घाटात याआधी 2 ठिकाणी दरड कोसळली होती. पण त्यावेळी वाहन किवा जीवितहानी झाली नव्हती. मात्र या दुर्घटनेत या स्विफ्टसह इतर काही वाहनांचेही नुकसान झाले आहे. घटनास्थळी टोकावडे पोलिस व महामार्ग पोलिस हजर झाले होते.
दरम्यान रस्त्यावर कोसळलेली दरड, माती व दगड यंत्रांद्वारे काढण्यात आली असून आता वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. या परिदारात धुके असल्याने वाहनचालकांनी घाटात न थांबता तसेच वाहनाचे दिवे लावून प्रवास करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.