गुवाहाटी – आसामचे राजधानीचे शहर गुवाहाटी पुढील वर्षाच्या सुरुवातीला खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सच्या पुढील आवृत्तीचे यजमानपदासाठी सज्ज आहे, असे संबंधित सूत्रांनी सांगितले आहे. चौथ्या आवृत्तीत २०० हून अधिक विद्यापीठांमधील ४,००० हून अधिक खेळाडूंचा सहभाग दिसेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गुवाहाटी भारताच्या क्रीडा राजधानीत बदलत आहे. दक्षिण आशियाई खेळ आणि खेलो इंडिया युथ गेम्सच्या यशानंतर, शहर आता खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सचे आयोजन करण्यास सज्ज झाले आहे, असे मुख्यमंत्री कार्यालयाने एक्सवर पोस्ट केले आहे.
WTC Points Table (2023-2025) : पाकिस्तानच्या पराभवाचा Team India ला झाला असा फायदा…
ही स्पर्धा १ ते १३ फेब्रुवारी २०२४ मध्ये १८ क्रीडा शाखांमध्ये होणार आहे. इंदिरा गांधी अॅथलेटिक्स स्टेडियम, गुवाहाटी विद्यापीठ आणि एलएनपीआयई, टेपेसियासह गुवाहाटीमधील नऊ ठिकाणी या स्पर्धा होणार आहेत.