Asim Sarode On Shinde Group Mla : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी महाराष्ट्रातून गुजरात मार्गे गुवाहाटी असा प्रवास केला होता. त्यादरम्यान अनेक घडामोडी देखील घडल्या. शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेकांनी त्यांच्यासह शिंदे गटातील आमदारांवर अनेक आरोप देखील केले. मात्र आता शिंदे गटाच्या आमदारांनी गुवाहाटीला एअर हॉस्टेसचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
वकील असीम सरोदे यांनी शिंदे गटातील आमदारांवर गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. सरोदे यांनी धाराशिवमधील ‘निर्भय बनो’ सभेत याबाबतचे आरोप केले आहेत. | Asim Sarode On Shinde Group Mla
या सभेत बोलताना वकील असीम सरोदे यांनी धक्कादायक आरोप केले. ते म्हणाले,”आमदार गुवाहाटीला जिथे थांबले होते तिथे इतर ग्राहकांना परवानगी नव्हती. पण दोन एअर कंपन्यांनी काही रुम्स बुक केलेल्या होत्या. त्यांचा वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट झाला होता. तिथे वरच्या मजल्यावर काही एअर होस्टेस राहत होत्या. एअर होस्टेसचा विनयभंग आणि लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न कुणी केला ? हे महाराष्ट्राने शोधून काढले पाहिजे असंही सरोदे यावेळी म्हणाले. | Asim Sarode On Shinde Group Mla
दारुच्या नशेत झिंगत असलेल्या आमदारांनी या गोष्टी केल्या. हा पैशांचा खेळ आता महाराष्ट्रात चालू द्यायचा नाही असंही सरोदे यावेळी म्हणाले.तसेच पळून गेलेल्या आमदारांना कोणी मारलं ? असा देखील जाब यावेळी सरोदे यांनी विचारला.
शिंदे गटाची प्रतिक्रिया
असीम सरोदे दोन वर्षांनी जागी झाले का ? असीम सरोदे वकील आहेत ना ? त्यांना कायदा आणि नियम कळतो ना ? असं काही घडलं असेल तर त्यावेळी झोपला होता का ? काहीतरी रंगवून सांगत आहेत. हे असं रचून आमच्या लोकांना बदनाम करण्याचं षडयंत्र आहे. गुवाहाटीत जा, तक्रार करा, तिथल्या अधिकाऱ्यांना भेटा. जा खात्री करा” असं प्रत्युत्तर मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलं आहे. | Asim Sarode On Shinde Group Mla