जुनागड (गुजरात) :- गुजरातच्या अनेक भागांमध्ये संततधार पाऊस सुरू असून जुनागड जिल्ह्यात त्यामुळे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. या भागात राष्ट्रीय संरक्षण प्रतिसाद दल (एनडीआरएफ) तैनात करण्यात आले आहे.
बचाव मोहिमेतील जवान आपदग्रस्त लोकांपर्यंत पोहोचले आणि त्यांनी त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवले. या पुरात कोणतीही जीवितहानी झाली नसून 40 बचाव पथके घटनास्थळी हजर आहेत, असे नवसारीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
नवसारीत सकाळी 8 ते 12 दरम्यान तुफान पाऊस झाला. यामुळे शहरातील सर्वच भाग जलमय झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग 48 वर पावसामुळे वाहतूक कोंडी झाली आहे.
वलसाड, भावनगर, द्वारका, दमण आणि दादरा नगर हवेलीसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर अहमदाबाद, आनंद, भरूच, बनासकांठा, साबरकांठा, अमरेली, जामनगर, गिर सोमनाथ आणि कच्छसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सुरेंद्रनगर, दाहोद, जुनागढ, राजकोट, बोताड, वडोदरा, सुरत आणि नवसारी येथे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तत्पूर्वी, शुक्रवारी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सुत्रापाडा, मंगरोळ आणि गीर सोमनाथ या पूरग्रस्त भागाचे हवाई सर्वेक्षण केले.