नगर – अनधिकृत जाहिरात होर्डिंग तसेच अभिनंदन, वाढदिवस, शुभेच्छांचे फलक हे मुख्य चौक, रस्ते, महापुरुषांच्या पुतळ्या भोवतीचे सौंदर्य नष्ट करून शहराच्या विद्रुपीकरणासोबतच अपघातास कारणीभूत ठरत आहेत. महापालिकेकडून याबाबत कोणतीही कारवाई होत नसल्याने मोठा उत्पन्नाचा स्त्रोत बंद झाला असून महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फटका बसत आहे.
मनपाच्या जागेवरील असोत अथवा खासगी मालकीची इमारत जागेवर असोत, असे शेकडो जाहिरात होर्डिंग अनधिकृत आहेत. कारण ते परवानगीशिवाय तसेच शुल्क न भरता उभारण्यात आले आहेत. होर्डिंग उभारणाऱ्यांना निर्धारित शुल्क भरून त्यांचे नियमितीकरण करावे लागेल. अन्यथा त्यांचे होर्डिंग जमीनदोस्त करण्यासोबतच त्यांच्याकडून नियमानुसार दंडही वसूल केला जाते. पण महापालिकेचा अतिक्रमण विभागासह जाहिरात फलक उभारणीपासून उत्पन्ना घेणार विभाग देखील झोपलेला आहे.
त्याचप्रमाणे लहान जाहिरातींविरोधात कारवाईचे अधिकार चाही झोनच्या प्रभागप्रमुखांना देण्यात आले आहेत. असे असले तरी मनपाला न जुमानता या जाहिराती शहरांत सर्वत्र दिसत असल्यामुळे शहराचे रूप भकास झाले आहे. आजवर अनधिकृत जाहिरात फलक लावणाऱ्यांकडून महापालिकेने कोणीही कारवाई केलेली नाही. त्यांना दंड देखील आकारलेला नाही. शहरातील प्रमुख चौक व रस्ते कोणत्याही जाहिरात फलकांनी व्यापलेले आढळून येतात. कोणी नेता येणार, कोणाचा वाढदिवस, कोणाची निवड एवढचे नाही तर खासगी व्यावसायिकांच्या देखील जाहिरात फलक राजरोजपणे लावले जातात. त्यापासून महापालिकेला एक रुपया देखील उत्पन्न मिळत नाही. मात्र या मुळे शहराच्या विद्रुपीकरणा मात्र भरत पडत आहे. महापालिका प्रशासन कारवाई करीत नसल्याने जाहिरात फलक उभारण्याचे फावले आहे.
महापालिका प्रशासनाची बघ्याची भूमिका
नगर शहरासह उपनगर व प्रमुख रस्त्यावर दर्शनी भागात अनेक मोठे होडिंग लावण्यात आले आहे. त्यापैकी अनेक होडिंग अनधिकृतपणे उभारण्यात आले आहेत. त्याबरोबर काही व्यावसायिकांनी देखील रस्त्यावर जाहिरात फलक लावले आहे. पण त्यावर कारवाई करण्याची महापालिकेची हिंमत नाही. त्यामुळे जाहिरात फलक राजरोजपणे उभे राहत आहे. त्याकडे महापालिका प्रशासनाची केवळ बघ्याची भूमिका आहे.