पुणे – करोना आणि ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने ख्रिसमस साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ख्रिश्चन बांधवांनी या सूचनांचे तंतोतंत पालन करणे अत्यावश्यक आहे, असे यामध्ये नमूद केले आहे.
या आहेत सूचना
चर्चमध्ये उपलब्ध आसनक्षमतेच्या 50% पर्यंत उपस्थिती. गर्दी होणार नाही आणि फिजिकल डिस्टन्सिंग आवश्यक. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर आवश्यक.
चर्चमध्ये निर्जंतुकीकरणाची व्यवस्था.
प्रभू येशू ख्रिस्त यांचे स्तुतिगीत गाण्यासाठी कमीत कमी गायकांचा समावेश.
चर्चच्या बाहेर किंवा परिसरात दुकाने अगर स्टॉलवर बंदी.
सार्वजनिक ठिकाणी अगर रस्त्यावर गर्दी करणे टाळावे.
गर्दी करणाऱ्या कार्यक्रमाचे अथवा मिरवणुकांचे आयोजन नको.
फटाक्यांची आतषबाजी नको. ध्वनी प्रदूषण नियमांचे पालन करावे.
स्थानिक प्रशासनाने केलेल्या नव्या सूचनांचे अनुपालन करावे.