मुंबई – गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. आज सर्वत्र गुढीपाडचे मंगलमय वातावरण दिसून येत आहे. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.
दरम्यान, याच मंगलमय दिवसाचे औचित्य साधत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व नागरिकांना गुढीपाढवा आणि मराठी नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्यात आहेत. आज अजित पवार यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी गुढी उभारून गुढीपाडवा साजरा केला. आणि सर्वांना गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या संदर्भातील एक पोस्ट अजित पवार यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.