नागपूर – मराठी नवीन वर्षानिमित्त विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहे. आज नागपूर येथे गुढीपाडव्या निमित्त आयोजित शोभायात्रेस त्यांनी हजेरी लावली. यावेळी फडणवीस म्हणाले ‘अयोध्येत भव्य राम मंदिर निर्माण झाले आहे, यानंतर गुढीपाडवा उत्सव अयोध्येमध्ये देखील आपण साजरा करू शकतो.’
आज गुढीपाडवा !
नवी सुरूवात
नवे संकल्प…
नवे वर्ष…
मराठी नूतन वर्षाच्या, गुढीपाडव्याच्या अनेक हार्दिक शुभेच्छा!#GudiPadwa #gudipadwa2022 pic.twitter.com/VaFpao8X7a— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 2, 2022
शुभेच्छा देतांना ते पुढे म्हणाले,’आज नववर्षाच्या निमित्त,’मी ईश्वर चरणी प्रार्थना करीन, सर्वांना ईश्वराने अतिशय सुख,समाधान, आरोग्य, ऐश्वर्य द्यावे, सगळ्यात महत्वाचं आपल्यासह संपूर्ण भारतला आणि विश्वाला आरोग्याचा आशीर्वाद ईश्वराने द्यावा.’असंही यावेळी फडणवीस यांनी म्हटलं.