मुंबई – ठाण्यातील ‘जायका हाॅटेल’मध्ये बाॅम्ब स्फोट होणार असल्याची धमकी फोनद्वारे आली आहे. या धमकीमुळे महाराष्ट्र पोलिस खळबळून जागे झाले आहे. अज्ञात व्यक्तीने महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून ही धमकी दिली आहे. धमकीच्या फोननंतर दहशतवाद विरोधीपथकासह इतर महत्वाच्या तपास यंत्रणांना अलर्ट करण्यात आले आहे.
फोनद्वारे मिळालेल्या या धमकीनंतर लगेचच पोलिसांनी ठाण्यातील जायका हाॅटेलच्या सुरक्षेत वाढ करण्याच्या सुचना दिल्या आहेत. धमकी देणाऱ्या अद्याताने ठाण्यासह कुर्ला चोर बाजार येथेही स्फोट घडवणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान पोलिसांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. शहरातील पोलिस यंत्रणांना अलर्ट करण्यात आले आहे.