IPL 2024 ( GT vs DC Match 32, Records ) :- आयपीएल 2024 चा 32 वा सामना बुधवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. हा सामना अतिशय मनोरंजक होता, जिथे गुजरातने सर्वात कमी धावसंख्या नोंदवली आणि दिल्ली कॅपिटल्सने चेंडूंच्या बाबतीत सर्वात मोठा विजय नोंदवला. चला तर मग जाणून घेऊया, दिल्ली-गुजरात मॅचमध्ये कोणते अनोखे विक्रम झाले.
1. गुजरातची सर्वात कमी धावसंख्या :- दिल्लीविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरात संघाला 100 धावाही करता आल्या नाहीत. गिलच्या नेतृत्वाखालील गुजरातचा डाव 17.3 षटकांत 89 धावांत सर्वबाद झाला. आयपीएलमधील गुजरातची ही सर्वात कमी धावसंख्या होती.
2. दिल्ली कॅपिटल्सचा सर्वात मोठा विजय :- 90 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सने 8.5 षटकांत 4 गडी राखून विजय मिळवला. दिल्लीने 67 चेंडूं राखून विजय मिळवला. चेंडू शिल्लक असताना दिल्लीचा हा सर्वात मोठा विजय ठरला. यापूर्वी 2022 च्या आयपीएलमध्ये दिल्लीने 57 चेंडू शिल्लक असताना मुंबईचा पराभव केला होता.
3. आयपीएलमध्ये 90+ लक्ष्याचा पाठलाग करताना घेतली गेली सर्वात कमी षटके :- 20 षटकांच्या आयपीएल सामन्यात 90 किंवा त्याहून अधिक धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वात कमी षटकांमध्ये नोंदवलेला हा तिसरा विजय ठरला. दिल्लीने 8.5 षटकांत विजयाची नोंद केली.
4. आयपीएल 2024 मध्ये सर्वाधिक विकेट गमावणारा संघ :- आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्स संघाने पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स गमावल्या आहेत. पॉवर प्लेमध्ये दिल्लीने आतापर्यंत एकूण 13 विकेट्स गमावल्या आहेत.
5. पंतने केली दिनेश कार्तिकची बरोबरी :- गुजरातविरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने उत्कृष्ट यष्टिरक्षणाचे प्रदर्शन केले. पंतने एकूण चार फलंदाजांना विकेटच्या मागे पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला, यासह त्याने दिनेश कार्तिकच्या विक्रमाची बरोबरी केली. 2009 मध्ये दिल्लीकडून खेळताना कार्तिकने राजस्थानविरुद्धच्या सामन्यात यष्टीमागून 4 फलंदाजांना आपला बळी बनवले होते.