Amay Khurasiya Success Story : असे म्हणतात की, “खेलोगे-कूदोगे तो होओगे खराब और पढ़ोगे-लिखोगे तो बनोगे नवाब. . पण खूप अभ्यास करून अन् शिकून कोणी खेळात करिअर केले तर काय म्हणावे? सुशिक्षित होऊन क्रीडा जगतात आलेले अनेक खेळाडू आहेत. यामध्ये अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ या नावांचा समावेश आहे. पण आज आपण ज्या खेळाडूबद्दल बोलणार आहोत तो त्या सर्वांपेक्षा एक पाऊल पुढे होता. त्याने केवळ पदवीच नाही तर देशातील सर्वात जुनी भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षा उत्तीर्ण केली. यानंतर त्याने भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवले. 90 च्या दशकात तो टीम इंडियासाठी क्रिकेट खेळला होता.
यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी, दरवर्षी लाखो उमेदवार परीक्षेला बसतात, परंतु त्यापैकी फक्त काही जण त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकतात. आजपर्यंत अनेक खेळाडूंनी ही कठीण परीक्षा उत्तीर्णही केली आहे, पण इथे आपण अमय खुरासियाबद्दल बोलणार आहोत. ( Amay Khurasiya Success Story ) भारतीय संघात पदार्पण करण्यापूर्वीच खुरासियाने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली होती. यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेला तो एकमेव आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे.
अमय खुरासिया याचा जन्म वर्ष 1972 मध्ये मध्य प्रदेशातील जबलपूर येथे झाला होता. तो डावखुरा फलंदाज आहे. त्याच्याबद्दल असे म्हटले जात होते की त्याच्याकडे वेगाने धावा काढण्याची कला होती. पण भारतीय संघात स्थान मिळवण्यापूर्वी त्याने आयएएस परीक्षा उत्तीर्ण केली होती आणि त्याची भारतीय सीमाशुल्क आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली होती.
1999 च्या विश्वचषक संघात होता समावेश…
एकेकाळी तो सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, अजय जडेजा आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यासोबतही क्रिकेट खेळत होता. त्याने वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी मध्य प्रदेशकडून खेळताना प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. डाव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या खुरासियाने 1999 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाकडून पदार्पण केले होते. 1999 च्या विश्वचषकासाठी त्याला भारतीय संघात स्थान मिळाले, पण त्याला एकदाही प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही.
अशी होती प्रथम श्रेणी कारकिर्द….
अमय खुरासियाची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द फार काळ टिकली नाही. भारतीय संघासाठी 12 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याला केवळ 149 धावा करता आल्या. त्याने भारताकडून शेवटचा सामना 2001 मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. दुसरीकडे, त्याने प्रथम श्रेणी कारकिर्दीत खूप प्रसिद्धी मिळवली. त्याने 119 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 7,304 धावा केल्या. याशिवाय त्याच्या नावावर प्रथम श्रेणी कारकिर्दीत 21 शतके आणि 31 अर्धशतकांचा समावेश आहे.
आता कुठे काम करत आहे…?
मिडीया रिर्पोटनुसार तर, अमय खुरासिया सध्या भारतीय कस्टम आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय त्याने आयपीएल 2024 मध्ये विराट कोहलीसोबत आरसीबीमध्ये खेळणाऱ्या रजत पाटीदारलाही क्रिकेटचे प्रशिक्षण दिले आहे. राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या आवेश खानलाही त्याने प्रशिक्षणही दिले आहे.