Success Story : दुखापतीमुळे संपली होती ‘या’ खेळाडूची आंतरराष्ट्रीय कारकीर्द, आता UPSC क्रॅक करून फडकवला झेंडा….

Kuhoo Garg cracks UPSC exam-2023 : अनेक वर्षे मेहनत करून खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंतचा प्रवास करतो. पण जेव्हा त्यांना त्यांच्या आवडत्या खेळापासून दूर जाण्यास भाग पडाव लागतं, तेव्हा अनेकांचा धीर सुटतो. अशीच परिस्थिती आल्यानंतर बॅडमिंटनपटू कुहू गर्गने हिम्मत हारली नाही. कुहूला UPSC परीक्षेत 178 वा क्रमांक मिळाला आहे, पण यशाचा मार्ग तिच्यासाठी सोपा नव्हता.
तिचे वडील अशोक कुमार म्हणाले की, “कोविड-19 साथीच्या आजारानंतर कुहूला उबेर कपच्या चाचण्यांदरम्यान गुडघ्याला दुखापत झाली होती, ज्यासाठी तिला शस्त्रक्रिया करावी लागली. तिला एक वर्ष बॅडमिंटन कोर्टवर जाता न आल्याने तिने युपीएससी परिक्षेची (civil services) तयारी करण्याचा निर्णय घेतला.”
याआधी कुहूच्या वडिलांनीही भारतीय पोलीस सेवेत (आयपीएस) काम केले होते, त्यांनी गेल्या वर्षीच निवृत्ती घेतली होती. कुहूचे वडील अशोक कुमार हे नोव्हेंबर 2020 ते नोव्हेंबर 2023 पर्यंत उत्तराखंडचे डीजीपी राहिले आहेत.
ट्विटरवर (एक्स) एका पोस्टद्वारे आनंद व्यक्त करताना ते म्हणाले की, “त्याच्या कुटुंबासाठी हा खूप अभिमानाचा क्षण आहे. कुहूने वयाच्या 9 व्या वर्षी बॅडमिंटन खेळण्यास सुरुवात केली आणि तिच्या महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरीच्या कारकिर्दीत 56 राष्ट्रीय आणि 19 आंतरराष्ट्रीय पदके जिंकून देशाचा गौरव केला.”
आज पूरे परिवार के लिए गर्व का पल है कि बेटी कुहू गर्ग आज घोषित हुए upsc के परिणामो मे 178वी रैंक लेकर आईपीएस IPS मे सेलेक्ट हुई |
कुहू बैडमिंटन की अंतर्राष्ट्रीय खिलाडी रही है और उसने 9 वर्ष की उम्र से ही खेलना चालू कर दिया था | कुहू ने 56 नेशनल / आल इंडिया रैंकिंग और 19… pic.twitter.com/LyBs4sJPtL— Ashok Kumar IPS (@AshokKumar_IPS) April 16, 2024
कुहू गर्गने 2018 वर्ल्ड चॅम्पियनशिपची उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. कुहू गर्गच्या वडिलांनी सांगितले की, त्यांची मुलगी कदाचित पहिली खेळाडू असेल जिने 6 वर्षे आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळले, वर्ल्ड चॅम्पियनशिपची क्वार्टर फायनलही खेळली आणि आता ती IAS किंवा IPS होणार आहे.
IPL 2024 : एका IPL सामन्यातून चीअरलीडर्स किती कमावतात ? तुम्हालाही जाणून वाटेल आश्चर्य….
तिच्या यशाचे श्रेय तिचे वडील अशोक कुमार यांना देताना कुहू गर्ग म्हणाली की, “बाबा, डीजीपी असताना, दररोज अनेकांना मदत करायचे आणि हे सर्व पाहून मलाही प्रेरणा मिळाली. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. मी ती वाचली आहेत आणि बाबांना प्रश्नही विचारले आहेत. अशाप्रकारे मला माझे नेतृत्व आणि मला मार्गदर्शन वडिलाकडून मिळाले. त्यामुळेच या यशात माझ्या वडिलांचा मोठा वाटा आहे.”





