नवी दिल्ली : देशात झपाट्याने वाढणाऱ्या करोनाबाधितांच्या एकूण संख्येने ५६ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. मागील २४ तासांत देशात ८३ हजार ३४७ नवे करोनाबाधित आढळले आहेत. तर, १ हजार ८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर करोनाबाधितांची एकूण संख्या ५६ लाख ४६ हजार ११ वर पोहचली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून याविषयी माहिती देण्यात आली आहे.
India's #COVID19 case tally crosses 56-lakh mark with a spike of 83,347 new cases & 1,085 deaths in last 24 hours.
The total case tally stands at 5,646,011 including 9,68,377 active cases, 45,87,614 cured/discharged/migrated & 90,020 deaths: Ministry of Health & Family Welfare pic.twitter.com/ATrAJsPIhr
— ANI (@ANI) September 23, 2020
देशभरातील एकूण ५६ लाख ४६ हजार ११ करोनाबाधितांमध्ये ९ लाख ६८ हजार ३७७ अॅक्टिव्ह रुग्ण, डिस्चार्ज मिळालेले ४५ लाख ८७ हजार ६१४ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या ९० हजार २० जणांचा समावेश आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या हवाल्याने एका वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.
२२ सप्टेंबरपर्यंत देशभरात ६,६२,७९,४६२ नमूने तपासणी झाली तर, ९ लाख ५३ हजार ६८३ नमूने काल तपासण्यात आले असल्याची माहिती आयसीएमआरने दिली आहे. ब्रिटनमध्ये करोना व्हायरसची दुसरी लाट येण्याची चिन्ह दिसत असून रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. करोना व्हायरसची दुसरी लाट रोखण्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी लोकांना ‘शक्य असेल तर घरातूनच काम करा’ असे आवाहन केले आहे तसेच बार आणि हॉटेल्स लवकर बंद करण्याचे आदेश दिले आहेत.