वाशिंग्टन- गेल्या काही महिन्यांमध्ये अमेरिकेत वैयक्तिक पातळीवर शस्त्रे खरेदी करण्याचा कल वाढत चालला असून त्याचाच परिणाम म्हणून गेल्या काही दिवसांमध्ये गोळीबाराच्या घटनाही वाढल्या आहेत. करोना महामारी आणि अमेरिकेत सुरू असणारे वर्णद्वेषी आंदोलन याचा परिणाम म्हणूनच लोकांनी मोठ्या प्रमाणात शस्त्र खरेदी सुरू केल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये 10 लाख बंदूक यांची विक्री झाली होती यावर्षी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारा लाख बंदुकीची विक्री झाली असून ते एक रेकॉर्ड मानले जात आहे.
कॅलिफोर्निया विद्यापीठात काम करणारे शस्त्र विषयक तज्ञ डॉक्टर गरेन मुटेत यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे अमेरिकेत एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीच बंदुकांची खरेदी झाली नव्हती खरे तर शस्त्रांची खरेदीचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होणे आवश्यक असते.
पण अमेरिकेत हे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे ही चिंतेची बाब आहे. मुख्य म्हणजे जे लोक शस्त्र खरेदी करत आहेत त्यांच्या घरात आधीच काही शस्त्रे उपलब्ध आहेत ज्यांच्याकडे आता कोणतेही शस्त्र नव्हते ती लोक सुद्धा आता शस्त्रे खरेदी करायला लागली आहेत.
लोकांचा प्रशासनावरील आणि पोलिसांवरील विश्वास कमी व्हायला लागला तर लोक असे वैयक्तिक पातळीवर शस्त्रे खरेदी करायला लागतात ही गोष्ट काही फारशी चांगली नाही अशी माहिती मेरिलॅन्ड युनिव्हर्सिटीतील तज्ञ डॉक्टर निल्या मेसन यांनी दिली.
अमेरिकेतील विविध बंदुकांच्या दुकानांमध्ये काम करणार्या माणसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे गेल्या वर्षामध्ये बंदुका आणि इतर शस्त्र खरेदी करणाऱ्या लोकांमध्ये विमा कंपन्या किंवा सॉफ्टवेअर कंपन्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अधिक समावेश होता.
आकडेवारी प्रमाणे अमेरिकेतील 39 कुटुंबांकडे बंदुका आहेत. अमेरिकेत शस्त्राची खरेदी केल्यानंतर त्याची नोंद सरकार दरबारी करावी लागते हा नियम असूनही लोक या नियमाचे पालन करून मोठ्या प्रमाणावर शस्त्राची खरेदी करत आहेत.