पुणे – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात संस्था, संघटना, मंडळांच्या वतीने विविध उपक्रम राबवून त्यांना अभिवादन करण्यात आले. पुणे स्टेशन येथील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यापुढे नतमस्तक होत शेकडो अनुयायांनी महामानवाला वंदन केले. स्टेशन परिसर भीमसैनिकांच्या गर्दीने फुलून गेला होता. उपनगरातही मिरवणुका काढून अनुयायांनी बाबासाहेबांना अभिवादन केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कर्वेनगरच्या स्वयंसेवकांनी कर्वेनगर येथील चेतीय गिरी बुद्ध विहार येथे भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. राजेंद्र कापसे यांच्यासोबत सगळ्यांनी बुद्ध वंदनेचे पठण केले. यावेळी अनिल व्यास, उदयन पाठक, अनिल वाघ, सुशील मेंगडे, विठ्ठल बराटे, न्यू सन्मित्र मित्र मंडळाचे कुणाल गायकवाड आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने सकाळी साडेनऊ वाजता अभिवादन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. मिरवणुकीचे उद्घाटन सोसायटीचे अध्यक्ष, कुलपती डॉ. पी. ए. इनामदार यांच्या हस्ते झाले. यावेळी कुलगुरू डॉ. एम. डी. लॉरेन्स, संस्थेचे सचिव प्रा. इरफान शेख, शाहिद इनामदार, एस. ए. इनामदार, असिफ शेख, अब्बास शेख, अफझल खान, मशकूर शेख, साबीर शेख, वाहिद बियाबानी आदी उपस्थित होते.
पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कमल व्यवहारे, रजनी त्रिभुवन, रफिक शेख, संगीता तिवारी आदी उपस्थित होते.
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी आणि शाहीर देवा कांबळे लोककला मंचातर्फे डॉ. आंबेडकरांच्या पुण्यातील आठ पुतळ्यांसमोर चैतन्य भीमरथ या फिरत्या रंगमंचाद्वारे “शाहिरी भीमवंदना’या कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे, प्रा. संगीता मावळे, शाहीर देवा कांबळे आदी उपस्थित होते.
राज्याचे उच्च-तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉ. आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माजी आमदार दीपक पायगुडे, हेमंत रासने, गणेश बिडकर यांच्यासह संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
सिम्बायोसिस संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारकातर्फे भारतरत्न डॉ. आंबेडकर जयंती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याला प्रा. डॉ. शरणकुमार लिंबाळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी सिम्बायोसिसचे संस्थापक-अध्यक्ष तथा कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, मानद संचालिका संजीवनी मुजुमदार, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते, डॉ. राजीव येरवडेकर आदी उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी “महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुआयामी प्रतिभावंत’ या विषयावर माजी कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव यांचे व्याख्यान झाले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख डॉ. मनोहर जाधव, अण्णा भाऊ साठे अध्यासन प्रमुख डॉ. सुनील भंडगे, व्यवस्थापन परिषद सदस्य रवींद्र शिंगणापूरकर, डॉ. नितीन घोरपडे, अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, डॉ. विजय खरे, वसुंधरा जाधव आदी उपस्थित होते.
रिपब्लिकन संघर्ष दलातर्फे संस्थापक संजय भिमाले यांच्या हस्ते डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संघटनेच्या वतीने 21 एप्रिलपर्यंत जयंती सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. तसेच डॉ. आंबेडकर लिखित पुस्तके, भाषणे, भाषणसंग्रह यांचे वाटप करण्यात येणार आहे. यावेळी नितीन बालकी, विशाल अंदे, प्रमोद बोडके, अरविंद पेगड्याल आदी उपस्थित होते.
राजमाता जिजाऊ जयंती उत्सव समितीतर्फे डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष सुशीला पवार, महिला अध्यक्ष श्रुतिका पाडाळे, तानाजी शिरोळे आदी उपस्थित होते.
रिपब्लिकन जनशक्ती पार्टीच्या वतीने डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अभिवादनासाठी आलेल्या नागरिकांना पाण्याच्या बाटल्या वाटप करण्यात आल्या. माऊली भोसले, रुक्मिणी घडसिंग, नूर हसन शेख आदी उपस्थित होते.
स्व. जगन्नाथ सकट समाजसेवा भावी संस्थेच्या वतीने डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी संविधान प्रत आणि लाडू वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष इंद्रजित सकट, किरण जगताप, नुरुद्दीन सोमजी, माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार दीपक पायगुडे आणि रमेश बागवे आदी उपस्थित होते.
झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मोहंमद शेख, काशिनाथ गायकवाड, सुरेखा भालेराव आदी उपस्थित होते.
रमाबाई महिला विकास संस्थेच्या वतीने डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेच्या संस्थापक-अध्यक्ष मायावती चित्रे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी निर्मला कणगिरी, वंदना चोरगे, फातिमा शेख आदी उपस्थित होते.
“एमआयएम’च्या वतीने डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. शहर अध्यक्ष शाहिद शेख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी निनाद धेंडे, मोमीन खान, इमाम शेख आदी उपस्थित होते. माई रमाई महिला प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेच्या संस्थापिका उज्ज्वला भालेराव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सरला भालेराव, श्रद्धा बाळे उपस्थित होते.
डीसीएम सोसायटीच्या वतीने डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डी. टी. रजपूत आणि सचिव विशाल शेवाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्राचार्य डॉ. जे. के. म्हस्के उपस्थित होते. विलास चौरे समाजसेवा प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष बाळासाहेब चौरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी पंचशील चौरे, हर्षदा चौरे, अर्चना कांबळे आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदारसंघाच्या वतीने डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष आनंद सवाणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी महेंद्र कांबळे, फिरोज तांबोळी, आकाश ताठे आदी उपस्थित होते.
भाजपा पर्वती विधानसभा झोपडपट्टी आघाडीच्या वतीने डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष गणेश शेरला यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी स्वाती शेरला, नजीर शेख, महेश साळुंखे आदी उपस्थित होते.
अखिल भटक्या विमुक्त जाती-जमाती महासंघाच्या वतीने डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रदेश अध्यक्ष आसिफ खान यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी राहुल तायडे, जावेद खान, रणजित दुपारगुडे, रवींद्र माने आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन करण्यात आले. उपाध्यक्षा संगीता तिवारी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी नंदा ढावरे, सुंदर ओव्हाळ, सुवर्णा माने, वैशाली शिंदे आदी उपस्थित होते.
पुणे जिल्हा महिला कॉंग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. महिला अध्यक्षा रिबेक कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कबिरा वाघमारे, रेश्मा शिंदे आदी उपस्थित होते. राष्ट्रीय मजदूर कॉंग्रेस, इंटकच्या वतीने डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. यावेळी ऍड. फैय्याज शेख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सरचिटणीस मनोहर गाडेकर, हमीद इनामदार, ऍड. विद्या पेळपकर आदी उपस्थित होते.
पुणे शहर राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस पक्षाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी महिला अध्यक्ष मृणालिनी वाणी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी आलेलक्ष्मी कोंडा, सुवर्णा माने उपस्थित होते. कृष्णाई ज्ञान प्रतिष्ठान आणि पुणे शहर भाजप महिला मोर्चाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुवर्णा भरेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी रत्ना जगताप उपस्थित होते.
बहुजन विकास आघाडीच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. दिनेश कोकल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी धनंजय घोलप, अरविंद बहुतुले, अहमद सय्यद, अजीज शेख, सनी रायकर, उमेश तेजी आदी उपस्थित होते.
प्रियदर्शनी शिक्षण संस्थेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा शशिकला कुंभार यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी महेश कुंभार, वर्षाराणी कुंभार आदी उपस्थित होते.
पुणे कॅन्टोन्मेंट कल्चरल असो. आणि कै. विठ्ठलराव शिवरकर प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. यावेळी ऍड. अतुल सोनवणे आणि पत्रकार सुनील माळी यांचे व्याख्यान झाले.
लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष छाया वारभुवन, मनोज पिल्ले, नितीन वाघवारे, फय्याज शेख आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र लहुजी आर्मीतर्फे अभिवादन करण्यात आले. अध्यक्ष विशालभाऊ सकट, कार्यकर्ते विकास अडसूळ, दत्ता बगाडे, वैष्णवी सकट, सुप्रिया खरात उपस्थित होते.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यातर्फे महात्मा फुले वाडा ते डॉ. आंबेडकर आंबेडकर पुतळा पुणे स्टेशन अशी “संविधान बचाव’ टू व्हिलर रॅली काढण्यात आली. शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, उपशहर प्रमुख डॉ. अमोल देवळेकर, गजानन थरकुडे, विशाल धनवडे, पल्लवी जावळे, अनिल दामजी आदी सहभागी झाले. आमदार रवींद्र धंगेकर यांनी रॅलीला संबोधित केले. यावेळी मोरे, देवळेकर यांची भाषणे झाली. स्पार्क फाऊंडेशनचे किशोर कांबळे, माय अर्थ फाऊंडेशनचे अध्यक्ष अनंत घरत यांनी केले. या मॅरेथॉनला पुणे जिल्हा ऍथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष अभय छाजेड, शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, पीएमटीचे माजी अध्यक्ष सुधीर काळे उपस्थित होते.
25 हजार पुस्तकांचे वाटप
आमदार रवींद्र धंगेकर आणि माजी आमदार मोहन जोशी यांच्याहस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बाबासाहेबांच्या अनुयायांना 25 हजार पुस्तकांचे वाटप करत असल्याचे धंगेकर यांनी सांगितले. यावेळी कमल व्यवहारे, शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, विशाल धनवडे, लता राजगुरू, सुशिला नेटके, संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे, बाळासाहेब अमराळे, प्रशांत सुरसे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन गणेश नवथरे यांनी केले.