मुंबई, – राज्यातील करोनाबाधितांचा आलेख दिवसेंदिवस उतरता असून आज नवीन आढळलेल्यांची रुग्णसंख्या थेट दोन हजारांच्या खाली पोहोचली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सोमवारी 1 हजार 966 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील 24 तासांत राज्यात 11 हजार 408 रुग्णांनी करोनावर मात केली आहे.
राज्यात सध्या 36 हजार 447 ऍक्टिव रुग्ण आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 76,61,077 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.66 टक्क्यांवर पोहोचले आहे.
राज्यात आज 12 करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर 1.82 % एवढा झाला आहे. याशिवाय राज्यात आज 8 नवीन ओमायक्रॉन रुग्णांची भर पडली आहे. हे आठही रुग्ण मुंबईत आढळले आहेत.